आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चव्हाण- पवारांच्या नातलगांची कंत्राटे रद्द, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दणका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुढील वर्षीपर्यंत शेतकऱ्यांना पाण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत वीज कनेक्शन देणार’ असे सांगून चार तास होत नाहीत तोच कोल्हापूर जिल्ह्यात अशी कनेक्शन देण्याच्या कामात हयगय करणाऱ्या चार कंपन्यांची कंत्राटे रद्द करण्याचा निर्णय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी घेतला. विशेष म्हणजे यातील दाेन कंपन्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या नातेवाइकांच्या अाहेत.
भाजपच्या अधिवेशनाचा शुक्रवारी काेल्हापुरात समाराेप झाला. या वेळी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अाघाडीच्या सरकारच्या भ्रष्टाचारी कारभारावर चाैफेर हल्ला चढवला. भाजपची ही सभा झाल्यानंतर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची ५ तास बैठक घेऊन त्यांची झाडाझडती घेतली. ‘सरकार बदललं आहे याची जाणीव ठेवा’ असे ठणकावत त्यांनी वीज कंपनीच्या कामाचा आढावा घेण्यास सुरूवात केली.
अाघाडी सरकारच्या काळात तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज कनेक्शनसाठी डांब उभारणे, ट्रान्सफार्मर बसवणे आणि तारा ओढणे या कामाची सुमारे ३०० कोटी रूपयांची कंत्राटे चार कंपन्यांना देण्यात अाली हाेती.
यातील एक कंत्राट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नातेवाईकांच्या कंपनीला दिले हाेते. ‘भागीदारी’चे सरकार असल्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अापल्या जवळच्या नातेवाईकाच्या कंपनीला दुसरे कंत्राट दिले. या कंपनीचे उद््घाटनही चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. परंतु चार वर्षे झाली तरी या कंपन्यांनी जिल्ह्यातील काम पूर्ण केले नाही. वीज कंपन्यानी त्यांना अनेक स्मरणपत्रे पाठवली, नोटिसा दिल्या. तरी या कंपन्यांनी दाद दिली नाही. तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या नातेवाइकांना कंत्राटे देण्यात अाल्यामुळे रखडलेल्या कामाबाबत अधिकाऱ्यांनीही या कंपन्यांना जाब विचारण्याचे धाडस केले नव्हते. मात्र, हा प्रकार समजताच ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी या चारही कंपन्यांची कंत्राटे रद्द केली आहेत.
...तर १५ हजार शेतकऱ्यांना न्याय मिळाला असता
^जर या कंपन्यांनी वेळेत कामे केली असती, तर ८००० शेतकऱ्यांना शेतीसाठीच्या पाण्याचे कनेक्शन मिळाले असते आणि ७००० जणांच्या घरात वीज कनेक्शन गेले असेत. या कामात या कंपन्यांनी हयगय केली हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक केली म्हणून या कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करता येईल का, याचाही विचार आम्ही करत आहोत. त्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात अाहे. तसेच आमच्या अधिकाऱ्यांचीही चूक झाल्याचे मी कबूल करतो. - चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री
बातम्या आणखी आहेत...