आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत पुजा-यानेच मारला मंदिरातील दागिन्यांवर डल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - वनमंत्री पतंगराव कदम यांच्या सांगलीतील बंगल्यासमोर असलेल्या जैन श्वेतांबर मंदिराच्या पुजा-यानेच भगवान महावीरांच्या मूर्तीवरील सोने- चांदीचे 18 तोळे दागिने लंपास करून चोरीचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच पुजा-याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.
शहरात भगवान महावीरांचे जैन श्वेतांबर मंदिर आहे. या मंदिरात पुजारी म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीला शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास तिघांनी मारहाण करत त्याचे हातपाय बांधून मंदिरातील मूर्तीवरील सोन्याचे टिक्के, कपाळपट्टी, असे सुमारे 18 तोळे सोन्याचे दागिने, मूर्तीवरील 2 किलो वजनाचे चांदीचे छत्र आणि दानपेटीतील रोख रक्कम असा 8 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
रविवारी सकाळी भाविकांना मंदिरातील दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या वेळी पुजा-याची चौकशी केली असता त्याने बनाव केला. मात्र, त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.