आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prithaviraj Chavan News In Marathi, Chief Miinister, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी हे देशाचे पंतप्रधान; कोण्या एका पक्षाचे नव्हे, चव्हाण यांचा नरेंद्र मोदींना टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - नरेंद्र मोदी हे कोणा एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत, ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा पक्ष मात्र हे मानायला तयार नाही. म्हणूनच हरियाणा, झारखंडचे मुख्यमंत्री आणि मला जाहीर कार्यक्रमात अपमानास्पद वागणूक मिळाली. म्हणून मी नागपुरातील कार्यक्रमाला हजर राहिलो नाही आणि हा आमचा सर्वोच्च पातळीवरचा राजकीय निर्णय आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे दिले.

सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, ‘एखाद्या राज्यात देशाचे पंतप्रधान पहिल्यांदा येतात, तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जायचे असते, हा प्रोटोकॉल आहे. मुंबईतील तनि्ही कार्यक्रमांना उपस्थित राहून मी तो पाळला; मात्र सोलापुरातील कार्यक्रमात काही विशिष्ट लोकांनी माझ्या भाषणावेळी जाणीवपूर्वक गोंधळ घातला. म्हणून मी नागपूरला गेलो नाही. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून लोकांच्या हिताच्या मागण्या मांडत होतो. मुख्यमंत्री काय किंवा पंतप्रधान काय, तो निवडणुकीपूर्वी एखाद्या पक्षाचा नेता असतो; मात्र पदावर निवड झाल्यानंतर तो लोकांना बांधील असतो, पक्षाला नाही. भाजपने मात्र मोदी हे केवळ आपल्या पक्षाचे पंतप्रधान आहेत, असे जाणीवपूर्वक भासवायला सुरुवात केली आहे. मोदी यांनी नवीन जबाबदारी स्वीकारली आहे, हे मान्य; मात्र लोकशाहीचा आदर राखला गेला पाहिजे.’

राज्यात आघाडीबाबत ते म्हणाले, ‘आघाडीचा निर्णय दिल्लीत झाला आहे. वधिानसभा निवडणूक आम्ही एकत्रितच लढू. काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत; मात्र आमच्या वाट्याच्या १७४ जागांसाठीच इच्छुकांच्या मुलाखती होतील. ही निवडणूक आम्ही ताकदीने लढवू.’

नितीन गडकरींचा हा दुजाभाव नाही का?
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘सोलापुरातील कार्यक्रमात मी दुष्काळामुळे राज्यात विजेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्राने कोळसा व गॅसचा पुरवठा करावा, अशी मागणी केली. राज्याच्या हिताच्या दृष्टीने ही मागणी होती; मात्र काही लोकांनी त्याचा राजकीय अर्थ काढला आणि गोंधळ घातला. त्यांना कसे वागायचे तसे वागू दे, आम्हाला फरक पडत नाही. नितीन गडकरी यांनी नागपूरसाठी मेट्रोचा प्रस्ताव लगेच मंजूर करून आणला आणि पुण्याचा मागे ठेवला, हा त्यांचा दुजाभाव नाही का, असा सवालही त्यांनी केला.

देशात महाराष्ट्र प्रथमच
देशात आपले राज्य प्रथम क्रमांकावर आहे. हे राज्य पाश्चिमात्य देशांसारखे घडवण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही नागरीकरणाचे आव्हान स्वीकारले आहे, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात व्यक्त केले. कराड तालुक्यातील विवधि विकासकामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

कटू निर्णय घेतले
अनेक वर्षे रेंगाळलेली कामे धोरणात्मक निर्णय घेऊन मार्गी लावली. यापूर्वी कोणी घेतले नाहीत असे महत्त्वाचे निर्णय शासनाने घेतले. सर्वसामान्यांचे प्रश्न, सहकारातले प्रश्न सोडवण्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागले, ते घेतले. युरोपात आपल्या राज्यासारखे छोटे देश आहेत त्यामुळे तिथे खूप विकास असल्याचे ते म्हणाले.
विकसित आहे, तसा महाराष्ट्र मला करायचा आहे.त्यासाठी मी कटीबध्द आहे असेही ते म्हणाले.