आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोग अतिउत्साही : मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. ‘निवडणूक आयोग अतिउत्साहीपणे काम करत आहे,’ असा टोला त्यांनी रविवारी कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना लगावला.

‘गारपीटग्रस्त परिसराचा दौराही करताना प्रशासनाची यंत्रणा वापरण्यात निवडणूक आयोगाने मला मज्जाव केला होता. निवडणूक प्रचाराच्याबाबतीतही त्यांच्याकडे फारशी स्पष्टता नव्हती,’ अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वीच शरद पवारांनीही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. ‘सध्या राज्यभर गाड्यांची तपासणी करून पैसे जप्त करण्याची मोहिम आयोगाने सुरू केली आहे. बॅँकांना एका शहरातून दुसर्‍या शहरात वाहनांद्वारेच पैसा न्यावा लागतो.

आयेागाच्या या कारवाईमुळे अशा बॅँका व व्यापार्‍यांची अडचण होत आहे,’ असे सांगताना निवडणूक आयोग जरा अतिच करतेय? त्यांना गाड्या तपासण्याचे अधिकार दिले कुणी? असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला होता.