आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - ‘विदर्भ, मराठवाड्याचा समान विकास करण्यास सरकार कटिबद्ध आहे. म्हणूनच राज्याचे तुकडे कदापिही होऊ देणार नाही,’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी दिले. ‘सहकारी कारखान्यांनी स्वत:साठी लागणारी वीज व पाण्याचे स्रोत स्वत: निर्माण करावेत, सरकारवर अवलंबून राहू नये,’ असे आवाहनही त्यांनी केले. भुइंज (जि. सातारा) येथील किसन वीर सहकारी कारखान्याच्या वीज निर्मिती प्रकल्पाच्या नामकरण समारंभात ते बोलत होते. येथील 22 मेगावॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाला यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले. या वेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार गजानन बाबर, आमदार जयकुमार गोरे, कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले आदी उपस्थित होते.