आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडाळा घाटात दोन खासगी बसचा भीषण अपघात, एक बस दरीत कोसळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र
(प्रतीकात्‍मक छायाचित्र)
सातारा - खंळाळा घाटात आज (रविवार) पहाटे चार वाजताच्‍या सुमारास दोन खासगी बसचा भीषण अपघात झाला. यामध्‍ये एक बस 30 ते 35 फूट खोल दरीत कोसळली असून, दोघांचा जागीच मृत्‍यू झाला तर 35 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी 12 गंभीर आहेत. त्‍यामुळे मृतांचा आकडा वाढण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
कसा झाला अपघात ?
प्रत्‍यक्षदर्शींनी दिलेल्‍या माहितीनुसार, अपघातग्रस्‍त वाहनांपैकी एक बस कोल्‍हापूरकडे जात होती तर दुसरी पुण्‍याकडे येत होती. दरम्‍यान, दोन्‍ही बसची समोरासमोर धडक झाली. यात एक बसची घाटात कोसळली.
नसपुरा मार्गावर गॅसचा टँकर पलटला
सातारा-पुणे मार्गावरील नसपुरा फाट्यावर आज (रविवार) सकाळी गॅस सिलिंटर घेऊन जाणारा एक टँकर पलटला. त्‍यामुळे वायूगळती झाल्‍याने या मार्गावरील वाहतूक निरामार्गे वळवण्‍यात आली आहे.