आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Professors Do Not Disturbing Student, Common Man ; Ajit Pawar Urging

विद्यार्थी, सामान्यांना प्राध्‍यापकांनी वेठीस धरू नये ; अजित पवारांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - व्यापारी तसेच प्राध्यापकांनी टोकाची भूमिका घेऊ नये. यात सामान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या दोघांचेही प्रश्न सामोपचाराने सुटू शकतात, तेव्हा संप थांबवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गुरुवारी केले. प्राध्यापकांना 500 कोटी देण्याची सरकारने तयारी केलेली असतानाही संप सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे नुकसान करणे योग्य नाही.

ज्या प्राध्यापकांनी नेट- सेट केले नाही त्यांना ते करण्यास मुदतही दिली. मात्र, आता पात्रता परीक्षाच नकोत ही प्राध्यापकांची भूमिका कितपत योग्य आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला. मानेंवर कारवाई व्हायलाच हवी लक्ष्मण माने यांच्या शिक्षण संस्थेवर मी संचालक आहे. ही संस्था भटक्या मुलांसाठी आहे, त्यांच्यासाठी चांगले काही होते म्हणून मी तिथे गेलो. मात्र मानेंसंदर्भात जे ऐकले त्याने मला धक्काच बसला. एका माजी आमदाराकडून हे अपेक्षित नाही. त्यांच्यावर कारवाई होईलच. पण यापुढेही कोणी असे वागल्यास त्यांना आम्ही पाठीशी घालणार नाही. माने यांनी असे काही केले असेल तर त्यांना कठोर शासन व्हायला हवे, असेही अजित पवार म्हणाले.