आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Property Matter Of Divisional Commissioner, Latest News

पुणे विभागीय आयुक्तांचे बेहिशेबी मालमत्ता प्रकरण,‘आरटीआय’ कार्यकर्त्याला धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- पुणे येथील महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी कुटुंबीयांच्या नावे खरेदी केलेल्या 300 एकर जमिनीची माहिती गोळा करणारे ‘आरटीआय’ कार्यकर्ते शिवाजीराव राऊत यांना दोघांनी धमकी दिली आहे. राऊत यांनी आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
आयुक्त देशमुख यांनी जांभे (ता. सातारा) येथे कुटुंबीयांच्या नावे 300 एकर जमीन खरेदी करून बेकायदा एनए केल्याचे उघड झाले आहे. शिवाजी राऊत यांनी हे प्रकरण बाहेर काढून ग्रामस्थांच्या मदतीने सनदशीर मार्गाने लढा सुरू केला आहे. त्यामुळे साताºयाच्या जिल्हाधिकाºयांनी सदर जमिनीचे एनए रद्द करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे देशमुख यांचे निकटवर्तीय निवृत्त गटविकास अधिकारी विजय धुमाळ व हेमंत निंबाळकर यांनी राऊत यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. राऊत मित्र साळुंखेंसह थांबले असताना तिथे आलेल्या धुमाळ व निंबाळकरांनी राऊत यांना धमकी दिली.
देशमुख यांचे नाव पंतप्रधान पुरस्कारासाठी पहिल्या क्रमांकात आहे. हे सहन होत नसल्याने काही लोक त्यांना विनाकारण त्रास देत आहेत. प्रकरण चिघळू देऊ नका, अन्यथा आम्हाला सर्व मार्गांचा अवलंब करावा लागेल,’ असा धमकीवजा इशारा या दोघांनी दिल्याचे राऊत यांनी तक्रारीत नमूद केले आहे. ‘जीवितास धोका असून भविष्यात काही घडल्यास धुमाळ व निंबाळकर जबाबदार असतील. माझ्या संरक्षणाची दक्षता घ्यावी,’ असेही राऊत यांनी निवेदनात नमूद केले आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी पदाचा गैरवापर करून ही 300 एकर जमीन कुटुंबीयांच्या नावे खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करून चौकशीचे आदेश दिल्यानंतर साताºयाच्या जिल्हाधिकाºयांनी बेकायदा एनए रद्द केला असून आता या व्यवहाराची चौकशी सुरू आहे. एनएसाठी मदत करणाºया अधिकाºयांच्या चौकशीची मागणीही होत आहे.