आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरात अनोखे आंंदोलन, प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या दारातच केला कचऱ्याचा ढिगारा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर-  येथील झूम कचरा प्रकल्पातील कचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनल्याने शिवसेनेने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर करचा ओतून आनोखे आंदोलन केले. तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या प्रकल्पाला जबाबदार असणा-या महानगरपालिका प्रशासनावर फौजदारी कारावाई करावी, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.

कोल्हापूर शहरात दररोज जवळपास 180 मेट्रीक टन कचरा जमा होतो. हा सर्व कचरा झूम प्रकल्पात आणून टाकला जातो. या ठिकाणी प्लास्टिक, खरमाती, अन्य कचरा विलग करण्याच्या यंत्रणा नसल्याने कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केल्या जात नाही. प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. सुमारे 25 हजार नागरीकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.
 

कोल्हापूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कच-याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. झूम प्रकल्पामुळे आरोग्याचा प्रश्न, मोकाट कुत्र्यांचा वावर, दुर्गंधी तसेच वर्षातील 12 ही महिने येथे आगीचे लोट दिसून येतात. यामुळे श्वसनाचा त्रास आदी समस्यांनी परिसरातील नागरीक त्रस्त झाले आहेत. महानगरापालिका सात ते आठ कोटी रुपयांचे अंदाजे बजेट खर्च करून कच-याचा डंप उभारणार असल्याची चर्चा सुरू आहे. येथे लागून नागरी वस्ती आहे. नागरीकांचा विचार न करता कोट्यावधी रूपये खर्च करून हा झूम प्रकल्प उभा करण्यात आला, असा आरोप शिवसेनेने केला आहे. या प्रक्रल्पातील इनर्ट कचरा टाकाळा लँडफील साईटमध्ये टाकण्यात यावा, अशी मागणी शिवेसनेच्या वतीने आज करण्यात आली. त्याचबरोबर या प्रश्नाची गांभिर्याने दखल घेतली नाही, तर सेंट्रल प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे कोल्हापूरच्या विभागीय महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची तक्रार करण्याचा आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज, शिवाजी जाधव, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
 
निषेधासाठी लावणार अभिनव फल...
कोल्हापूर शहरात सर्वत्र झुमच्या कचऱ्याची छायाचित्रे असलेले आणि त्याबरोबर स्वच्छ भारत अभियानचा लोगो गांधीजींचा चष्मा असलेले फलक लावून मनपा अधिकाऱ्यांचा अभिनव निषेध करणार अशी माहिती दिव्य मराठी वेब टीमशी बोलताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिली.