आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ मारेक-यांनाच नव्हे प्रमुख सुत्रधारांनाही पकडा ; दाभोळकर कुटूंबाची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन आठ दिवस लोटले आहेत, तरी अद्याप गुन्हेगारांना पकडण्यात यश आले नाही. हे शासनाचे अपयश आहे. अजूनही आमचा पोलिसांवर विश्वास आहे. केवळ मारेक-यांना न पकडता सुत्रधारही समोर आणा, अशी मागणी डॉ. शैला दाभोलकर यांनी केली. तपासात दिरंगाई झाल्याने दाभोलकर कुटुंबीय नाराज आहेत. या पाश्र्वभूमीवर दिव्य मराठी प्रतिनिधीने डॉ.शैला, डॉ. हमीद आणि मुक्ता यांच्याशी संवाद साधला.


डॉ. दाभोलकर जिवंत असताना त्यांना न्याय मिळाला नाही. ते ज्या विधेयकासाठी आयुष्यभर झटले त्या जादूटोणा विधेयकात अनेक सुधारणा सुचवल्या गेल्या. त्यातील अनेक कलमे वगळली, ही बाब आमच्या दृष्टीने दु:खदायक आहे. इतके सारे घडल्यानंतरही हे विधेयक मंजूर होईल की नाही याची शाश्वती नाही, त्यांच्या मारेक-यांना अद्यापही अटक झाली नाही. परंतु केवळ मारेकरी सापडून आणि त्यांना शिक्षा होऊन चालणार नाही तर या कारस्थानामागील सूत्रधार सापडायला हवेत.


डॉ. शैला दाभोलकर, पत्नी
मुख्यमंत्र्यांनी हत्येबाबतच्या तपासाची माहिती आम्हाला दिली. मात्र या प्रकरणातील मारेकरी अद्यापही मोकाटच आहेत. त्यांचा लवकरात लवकर छडा लावावा अशी आमची इच्छा आहे. पोलिसांवर आमचा अद्यापही विश्वास आहे. ते त्यांच्या पद्धतीने योग्य तो तपास करतील. त्यांनी लवकरात लवकर मारेक-यांचा छडा लावावा, अशी आमची अपेक्षा आहे. पोलिस खात्यात माझे अनेक मित्र आहेत. त्यांनीही मला याविषयी आश्वासन दिले आहे.


डॉ. हमीद दाभोलकर, मुलगा
बाबा आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटले. त्यांचे विचार आताही थांबणार नाहीत. अंधश्रद्धा, जादूटोणा इत्यादी बाबींसाठी अनेक चळवळी सुरू आहेत. त्यातील कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खूप प्रयत्न करत आहेत. अशा विविध विषयांवर आधारित चळवळीतील कार्यकर्त्यांना शासनाने पाठिंबा दिला पाहिजे.
मुक्ता दाभोलकर, मुलगी