आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारला इशारा: पुरोहित संघाच्या मागण्यांची पूर्तता न केल्यास आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पुरोहितांना निधी निर्माण करून मदत करणे,वर्षभरात जिल्हा पातळीवर पुरोहितांचे अधिवेशन घेणे आणि पुरोहितांच्या मुलींचे विवाह पुरोहितांच्या मुलांशी करणे या महत्वाच्या ठरावांना पुरोहितांच्या अधिवेशनात एकमताने मंजूर करत अधिवेशनाची सांगता झाली. दरम्यान पुरोहित संघाने याआधी केलेल्या मागण्यांची पूर्तता शासनाने न केल्यास विधानसभेवर मोर्चा काढला जाईल असा इशारा या अधिवेशनात देण्यात आला.
येथील स्वराज मंगल कार्यालयात अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या पुरोहित आघाडीच्यावतीने सर्व शाखेच्या पुरोहितांचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले. त्यात रविवारी शेवटच्या दिवशी काही ठराव मंजूर करण्यात आले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर होते तसेच भागवताचार्य वा.ना.उत्पात यांची प्रमुख उपस्थिती होती.भाषणात चरेगावकर म्हणाले,सद्यस्थितीत कुटूंब व्यवस्था टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी ब्राह्मणांनी पुढाकार घ्यावा.आपल्या संस्कृती,परंपरेची शिकवण तरुणांना देण्यासाठी संंस्कारपीठ उभे करावे. समाजाने संघटित झाले पाहिजे. उत्पात म्हणाले,ब्राह्मण वर्गाबद्दल सध्या सुरू असलेला अपप्रचार पुराव्यानिशी खोडून काढावा. अन्यथा भविष्यात तो धोका वाढू शकतो. समारोपात पुरोहित आघाडीचे राज्य अध्यक्ष महेश पाठक यांनी मांडलेले तीन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

मोहनबुवा रामदासी यांनी ,हे अधिवेशन या पुढे केवळ सातारा किंवा राज्यात घेतले जाणार नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये वा इतर राज्यांत घ्यावे, अशी सूचना केली. ते पुढे म्हणाले,आज ब्राह्मण वर्गाला जातीयवादी ठरवले जात आहे.हे रोखायाचे असेल तर समर्थ रामदासांची शिकवण आचरणात आणावी. अखिल ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी पुढील वर्ष हे आरोग्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असून राज्यभरात आरोग्य विषयक ३५० शिबिरे घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

एका चर्चा सत्राच्या अध्यक्षीय भाषणात पं.कुलगुरु वसंतराव गाडगीळ यांनी पौरोहित्य हा सर्वश्रेष्ठ व्यवसाय असून त्याचे पावित्र्य जपण्याचे काम पुरोहितांनी केले पाहिजे.धर्मिक वेदांच्या शिक्षणा बरोबर आधुनिक विज्ञानाचे ज्ञान ही अवगत केले पाहिजे असे सांगीतले.ते पुढे म्हणाले शहरी भागातील पुरोहितांसाठी विविध धार्मिक विद्यापीठांच्या कुलगुरुंनी एकत्र येऊन स्वाध्याय गुरुकुल वर्ग सुरु करण्याची आवश्यकता आहे.धर्म,आचरण,वेद-पुराणे आणि विज्ञाननिष्ठा याचे मार्गदर्शन तसेच अध्ययन या वर्गात सुरु करण्याचे प्रयत्न आता करूया असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

गोविंद कुलकर्णी यांनी या व पुढील वर्षाची रुपरेषा सांगीतली : मोहनबुवा रामदासी यांनी ,हे अधिवेशन या पुढे केवळ सातारा किंवा राज्यात घेतले जाणार नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये ही अधिवेशन घेतले जाईल असा विश्वास व्यक्त केला.ते पुढे म्हणाले,आज ब्राह्मण वर्गाला जातीयवादी ठरवले जात आहे.हे रोखायाचे असेल तर समर्थ रामदासांची शिकवण आचरणात आणली पाहिजे.मिलिंद एकबोटे यांनी पुरोहितांनी गोमाता रक्षणासाठी पुढाकार घ्यावा असे सांगून मराठा समाजाला ब्राह्मण समाजा विरुध्द भडकवण्याचे काम केले जात आहे.यासाठी मराठा तसेच सर्व समाजांमध्ये सलोखा निर्माण होण्याची गरज आहे, विषेशता: ब्राह्मण आणि मराठा समाजाने समाजासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असेप्रतिपादन केले. अधिवेशनास राज्यातील ठिकठिकाणाहून पुरोहित मंडळींनी उपस्थीती लावली होती.

१३ ऑगस्ट रोजी धरणे
पुरोहित संघाने गेल्या वर्षी शासनाकडे तीन मागण्या केल्या होत्या. मात्र त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यामुळे १३ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल. त्याची ही दखल शासनाने न घेतल्यास हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढला जाईल असा इशारा अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी दिला.