आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Qualis Car And Truck Acccident Near Kolhapur. Four People Dead

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देवदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या कारला ट्रकने चिरडले; चौघांचा जागीच मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- देवदर्शनाला जाणार्‍या वसई-विरारच्या भाविकांवर कोल्हापुरातील कागलजवळ काळाने घाला घातला. मागून येणार्‍या भरधाव ट्रकने भाविकांच्या क्वालिस कारला भीषण धडक द‍िल्याने झालेल्या अपघातात चौघाचा मृत्यु झाला तर सात जण गंभीर जखमी झाले आहे.

मिळालेली माहिती अशी की, वसई-विरारमधील काही भाविक कर्नाटकच्या दिशेने जात होते. मागून येणार्‍या ट्रकने त्यांच्या क्वालिस कारला जोरदार धडक दिली. अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी आहेत. जखमींवर कोल्हापूरातील प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, क्वालिस कारचा झालेला चेंदामेंदा...