आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्याच्या अंतिम दर्शनासाठी लोटला जनसागर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील उर्फ आबा यांच्यावर काल अंजनी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नी सुमन, मुलगी स्मिता, सुप्रिया, खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थिवाचे शेवटचे औक्षण केले. त्यानंतर मुलगा रोहित मुलींनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला. स्वच्छ निष्कलंक चारित्र्याच्या या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून जनसागर लोटला होता.

अंत्ययात्रेत ‘अमर रहे अमर रहे’च्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनाही शोक अनावर झाला होता. प्रचंड ऊन तापले असतानाही लोक आपल्या लाडक्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी उभेच होते. आपल्या घरचाच करता माणूस गेल्याचे दु:ख होऊन महिला धाय मोकलून रडत होत्या. अंत्यविधीच्या ठिकाणी गाड्यांवर ‘आपला माणूस हरपला’ असे पोस्टर्स लावण्यात आले होते. शोकसागरात बुडालेल्या लाखोंच्या जनसागराने आबांना अखेरचा निरोप दिला.
आईला वाईट वाटेल म्हणून...
आपल्याला कर्करोग झाल्याचे अाबांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच माहीत झाले होते. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असताना माजी मंत्री जयंत पाटील त्यांची विचारपूस करायला गेले असता त्यांनी ‘आधीच का सांगितले नाही?’असे विचारले असता आबांनी ‘आईला समजले तर तिला वाईट वाटेल म्हणून मी कोणालाच बोललो नाही’ असे सांगितले. जयंत पाटील यांनी ही अाठवण शोकसभेत सांगितल्यावर सर्वच उपस्थित हळहळले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, आर. आर पाटील यांच्या अखेरच्या प्रवासाचे फोटो...