आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्मदा प्रकल्पाबाबत मौन का?: आर.आर.पाटील

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- सिंचन प्रकल्पांची किंमत वाढली म्हणून ओरड करणारा भाजप ‘कॅग’ने ताशेरे ओढलेल्या गुजरातमधील नर्मदा प्रकल्पाच्या किमतीवर का बोलत नाही, असा सवाल गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केला.

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त 301 ट्रक चा-याचे पाटील यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यासाठी वितरण करण्यात आले. या वेळी पाटील म्हणाले, ‘काहीही चूक झाली की राष्ट्रवादीला धारेवर धरले जाते. आमच्याकडून चांगल्या कामाच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे ही टीका आम्ही समजू शकतो. मात्र भाजपचे नेते पश्चिम महाराष्ट्रात आले की सिंचन योजना अर्धवट राहिल्या म्हणून ओरड करतात आणि विदर्भात जाऊन पश्चिम महाराष्ट्रातच निधी पळवला म्हणून टीका करतात, असा आरोप त्यांनी केला.