आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योग्यवेळी उत्तर देऊ : आर.आर. पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- नकला करायला देखील अक्कल लागते. मात्र आम्ही आत्ताच उत्तर देणार नाही. वेळ आल्यावर चोख उत्तर देऊ, असा टोला गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज यांनी कोल्हापूर येथील सभेत आर.आर यांच्यावर आगपाखड केली होती तर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नक्कल केली होती. यावेळी पाटील म्हणाले, नकला करायलादेखील अक्कल लागते. कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे आणि मुंबईत राज ठाकरे यांनी केलेल्या सभांचे आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. योग्य वेळ आल्यावर त्यांना चोख उत्तर देऊ.