आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आबांच्या नावाने अंजनीत शाळा, शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे पहिले स्मारक म्हणून त्यांच्या अंजनी गावात रयत शिक्षण संस्थेने उभारलेल्या शाळेच्या नव्या इमारतीचे उद‌्घाटन रविवारी झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पंचक्राेशीतील ग्रामस्थ व साक्षात वरुणराजानेही हजेरी लावत आपल्या लाडक्या नेत्याला (आबांना) आदरांजली वाहिली.

तासगाव तालुक्यातील अंजनी हे आबांचे गाव. रयत शिक्षण संस्थेने १९७१ मध्ये या गावात अंजनी हायस्कूल या नावाने शाळा सुरू केली. एका वाड्यात सुरू झालेल्या या शाळेसाठी नंतर गावातील महाजन नामक व्यक्तीने स्वत:ची जमीन दिली. या जागेवर आर.आर.पाटील यांच्या हयातीतच इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात आबांचे निधन झाले आणि शाळेच्या इमारतीचे उद‌्घाटन लांबले. आबांच्या पश्चात या शाळेला त्यांचेच नाव देण्याचा निर्णय रयत शिक्षण संस्थेने घेतला हाेता. आबांचे पहिले स्मारक ठरणार्‍या या शाळा इमारतीचे रविवारी शरद पवार यांच्या हस्ते उद‌्घाटन झाले. सकाळपर्यंत पावसाचा मागमूसही नसताना उद‌्घाटन कार्यक्रमाला सुरुवात होताच पावसाचे जोरदार आगमन झाले. ‘हा पाऊस म्हणजे आबांचे लाभलेले आशीर्वाद आहेत,’ अशा भावना आबांच्या कन्या स्मिता यांनी व्यक्त केल्या आणि संपूर्ण वातावरणच भावुक बनले हाेते.

(फोटो : आर.आर. पाटील यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या शाळेच्या नव्या इमारतीचे उद‌्घाटन रविवारी अंजनीत शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी भर पावसातही आबांचे चाहते खुर्च्या डाेक्यावर घेऊन कार्यक्रमास उपस्थित हाेते.)
बातम्या आणखी आहेत...