आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharshtra Ex Home Minister Patil\'s Mother And Wife Working In Farm

आबांची आई-पत्नी करतात शेतात काम, शरद पवारांनाही वाटायचे आश्चर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे आज (सोमवार,16 फेब्रुवारी) निधन झाले. आर.आर. पाटील यांना त्यांचे निकटवर्तीय आबा म्हणत. राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर ते स्वपक्षीयांसोबतच सर्वांसाठी 'आबा' झाले. 57 वर्षांचे आबा राष्ट्रवादी काँग्रेसचा अस्सल ग्रामीण चेहरा होते. राज्याचे गृहमंत्री असतानाही साधी राहाणी हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले. त्यांची पत्नी, मुले आणि वृद्ध आई गावाकडेच राहात होती. पक्षाध्यक्ष शरद पवार यांना देखील त्याचे कुटुंब गावाकडेच राहाते याचे कौतूक वाटत राहिले. पाच वेळा आमदार आणि कॅबिनेट मंत्री राहिलेल्या आबांची आई त्यांच्या प्रचारकाळातही नित्यनियमाने शेतात कामाला जात होत्या. हाच साधेपणा आबांनी शेवटपर्यंत जपला. काही महिन्यांपूर्वीच राज्यात विधानसभा प्रचाराचा धुराळा उडाला होता. यावेळी आमचे प्रतिनिधी राकेश कदम यांनी आबांच्या गावी जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली होती. या मुलाखतीचा संपादित अंश येथे देत आहोत.
आबा राज्यभर प्रचाराचा धुरळा उडवण्यासाठी सज्ज असले तरी त्यांच्या कुटुंबाचा नित्यक्रम सामान्य लोकांप्रमाणे सुरू आहे. घरासमोर कार्यकर्त्यांची वर्दळ नाही, गावात कुठलाही गाजावाजा नाही. आबांच्या आई भागीरथी (वय 80) आजही शेतीची कामे पाहत आहेत. आबांची मुलगी स्मिता राजकीय हालचालींचा कानोसा घेत असली तरी मुलगा दहावीच्या अभ्यासात मग्न आहे. सौभाग्यवतींचा नित्यक्रम फारसा बदललेला नाही. अंजनी (ता. तासगाव, जि. सांगली) हे आबांचे गाव.
गावातील सर्व लोक आबांच्या मातोश्रींना काकी म्हणतात. काकी शुक्रवारी दुपारी आपल्या शेतात खुरपण करणा-या महिलांसोबत रमल्या होत्या. त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही तर शेतात काम करीत आहात, आबांचा प्रचार वगैरे करणार नाही का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, “पूर्वी एक दोन-दिवस प्रचाराला जायचे. आता गुडघेदुखीचा त्रास होतो. शेतातली कामंबी बघावी लागतात. प्रचार सुरू झाला की लोकांना भेटेन, पण लय काय करता येणार नाय.”

आबांवर अनेक वेळा खालच्या पातळीवर जाऊन टीका होते. आई म्हणून तुम्हाला काय वाटते? या प्रश्नावर काकी म्हणाल्या,“आबा चांगलं काम करतो, पण त्याच्यावर टीका झाली की वाईट वाटते. चांगले बोलणारेही लोक आहेतच. शेवटी राजकारण आहे. सत्ता असली की लोकांना राजकारण चांगले वाटते, सत्ता नसली की वाईट वाटते. जगाची रीतच आहे.”

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली आहे. तुम्हाला याचे वाईट वाटत नाही का? असे विचारले असता काकी म्हणाल्या, “त्याचं काय! काँग्रेससोबत भांडूनच राष्ट्रवादी काढली ना? त्यात वाईट वाटायचं काय? आता सगळेच तुटले, बघू काय होतंय ते.”

तुमची नात स्मिता राजकारणात प्रवेश करू इच्छित होती. सुप्रिया सुळे यांच्या युवती मेळाव्यांमध्येही त्या दिसल्या. आता त्या राजकारणापासून दूर का आहेत? यावर त्या म्हणाल्या, “होय, आम्हीच तिला थांबवलंय. पुढे बघू, आता तर काय ठरवलेले नाही.”

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आठवणीतील आबा