Home »Maharashtra »Western Maharashtra »Kolhapur» Rada Between Satej Patil And Mahadev Mahadiks Supporters In Kolhapur

कोल्हापूरात सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक गट आमनेसामने, खुर्च्यांची फेकाफेकी

प्रतिनिधी | Sep 28, 2017, 15:58 PM IST

कोल्हापूर- छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या आज (गुरुवारी‍) झालेल्या वार्षिक सभेत विरोधकांनी एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेकी केली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने विरोधी सभासदांनी सभा संपल्यानंतर राडा केला. या घटनेने शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सत्ता माजी आमदार व संचालक महादेवराव महाडिक यांच्या गटाकडे आहे. माजी गृहराज्यमंत्री आणि विद्यमान आमदार सतेज पाटील यांचा गट सत्तारूढ गटाच्या विरोधात आहे. त्यामुळे आजच्या सभेत गोंधळ होणार अशी चर्चा सभासदांमध्ये सुरु होती. राजाराम सहकारी साखर कारखान्यासंदर्भात विरोधकांनी महत्त्वाचे 16 प्रश्‍न विचारले होते. त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झाला. माजी आमदार महादेवराव महाडिक बोलायला उभे राहिले. त्यांनी सभासदांना कोणताही गोंधळ करून सभेला गालबोट लावू नये आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील असे सांगितले.

त्यानंतर त्यांनी उत्तरे देण्यास सुरुवात केली.मात्र या उत्तरातून समाधान न झाल्याने विरोधी सतेज पाटील गटाच्या सभासदांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. या गोंधळातच विषय पत्रिकेवरील विषय मंजूर करण्यात आले. त्यामुळे प्रचंड आरडाओरडा सुरु झाल्याने सभा गुंडाळण्यात आली. सभा संपल्यानंतर आक्रमक सभासदांनी खुर्च्याची फेकाफेकी करुन आपला संताप व्यक्त केला.आणि विरोधक सभासदांनी समांतर सभा घेतली.
काही दिवसापूर्वीच कोल्हापूर जिल्हा दुध संघाची सभा महादेवराव महाडिक यांनी अनपेक्षितपणे अशाच प्रकारे गुंडाळली होती. महाडिक यांचे कट्टर विरोधक आमदार सतेज पाटील यांनी त्यावेळी तीव्र विरोध केला होता. म्हणूनच आजही दोन गटाच्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर ही सभा वादळी करण्यात आली.

दरम्यान कारखान्याचे को- जनरेशन प्लॅन्ट वाढविण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती कारखान्याचे संचालक महादेवराव महाडिक यांनी याच घाईगडबडीत दिली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

Next Article

Recommended