आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा गर्भलिंग चाचणी करणा-यांवर छापा; डॉक्टर फरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - बेकायदा गर्भलिंग चाचणी करत असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी जिल्ह्यातील पिंपरी (ता. माण) येथील डॉ. दिलीप राजगे यांना अटक करण्यासाठी सापळा रचला, मात्र कुणकुण लागताच डॉ. राजगेने पळ काढला. त्यांच्याविरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पिंपरी येथील चैतन्य रुग्णालयात डॉ. राजगे बेकायदा गर्भलिंग चाचणी करत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. पुण्यातील अशोक सावंत राजगे यांच्याकडे चाचणीसाठी ग्राहक पाठवत असे. याबाबत खातरजमा झाल्यानंतर रविवारी पुणे पोलिसांनी सावंत यांच्याकडे बनावट ग्राहक पाठवून विचारणा केली. सावंत याने त्या व्यक्तीला राजगे यांच्याकडे पिंपरीत पाठविले होते.
पोलिस त्यांच्या मागावर होतेच. मात्र कारवाईची कुणकुण लागताच डॉ. राजगे, सावंत यांनी पोलिसांना चकवा देत रुग्णालयाच्या पाठीमागील दाराने पळ काढला. पुण्याचे महानिरीक्षक चंद्रकांत कुंभार, डॉ. एस. आर. वैद्य, गोंदवलेच्या डॉ.अर्चना सोनवले यांचे पथक या कारवाईसाठी गेले होते. दरम्यान फरार डॉक्टरसह या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.