आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : बंदी झुगारून रायगडावर बसवले पंचधातूचे छत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड - पुरातत्त्व खात्याची बंदी झुगारून किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरील पूर्णाकृती पुतळ्यावर शिवप्रेमींनी 132 किलो वजनाचे पंचधातूचे छत्र बसवले.
छत्र बसवण्यास केंद्राच्या पुरातत्त्व खात्याने परवानगी नाकारली होती. तसेच त्या ठिकाणी जमावबंदीचे कलम 144 लावण्यात आले होते. मात्र रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 338 वा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार उत्साहात साजरा करण्यात आला. याच वेळी शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे छत्र बसवण्यात आले. ( फोटो - रवींद्र चाळके )