आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चासाठी रेल्वेच्या प्रत्येक गाडीला जादा डबे, रेल्वेमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - येत्या ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाच्या मागण्यासाठी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे. राज्यातून लाखो लोक मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यासाठी कोल्हापूरसह महाराष्ट्रातून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मराठा बांधवांसाठी रेल्वेला जादा डबे जोडण्यात यावेत अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना केली होती. त्यानुसार, रेल्वेमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. 
 

परतण्याचीही व्यवस्था
दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यालयात खासदार संभाजीराजेंनी भेट घेतली. या मोर्चासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक सहभागी होणार आहेत. त्यांना मुंबईत रेल्वेने तातडीने पोहचण्यासाठी प्रत्येक गाडीला जादा डबे वाढवून देणे आणि परतीच्या प्रवासासाठी सुद्धा मुंबईतून राज्याच्या काना-कोपऱ्यात परतण्यासाठी अतिरिक्त डबे रेल्वेला जोडण्यात येण्याची मागणी ही संभाजीराजे यांनी केली होती.
 
तोंडावर आलेल्या या मोर्चाचे गांभीर्य लक्षात घेवून रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मुंबईकडे जाणाऱ्या व ९ ऑगस्ट रोजी सकाळपर्यत पोहचणाऱ्या सर्व गाड्यांना जादा डबे जोडण्यात येतील. तसेच ९ ऑगस्ट रोजी मुंबईहून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात परतणाऱ्या गाड्यांना सुद्धा अतिरिक्त डब्याची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
बातम्या आणखी आहेत...