आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raj Shetty News In Marathi, Shetkari Swabhimani Sanghtana, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुतीत वादाची ठिणगी, विरोधकांना उमेदवारी दिल्याने राजू शेट्टी नाराज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत ज्यांचे सहकार्य घेऊन शिवसेना- भाजप युतीने पश्चिम महाराष्ट्रात सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावला, त्याच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या विरोधकांना आता विधानसभेत उमेदवारी देण्याचा घाट शिवसेनेने घातला आहे. त्यावर नाराजी व्यक्त करत शेट्टींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौ-यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे आधीच जागा वाटपाच्या मुद्द्यावर ताणाताणी झालेल्या महायुतीतील वादात नव्याने ठिणगी पडली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी खासदार सदाशविराव मंडलिक यांच्या हमीदवाडा येथील साखर कारखाना परिसरात उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण झाले. मंडलिक हे पुरोगामी चळवळीतील नेते म्हणून ओळखले जातात. सुरूवातीला काॅंग्रेस, नंतर राष्ट्रवादी, नंतर पुन्हा कॉंग्रेस असा प्रवास करतानाच आता त्यांच्या चिरंजीवांनी भगवा हाती घेतला आहे. त्यांच्या कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयाचे उदघाटनही यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमात मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली.

मातीवर प्रेम करणारे मुस्लिम बंधू
कागल मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांचा मेळावा असल्याने सदाशिवराव मंडलिक यांचे राजकीय विरोधक हसन मुश्रीफ यांच्याविषयी भाष्य होणार याची उपिस्थतांना खात्री होतीच. सुरूवातीला माजी खासदार मंडलिकांनी मुश्रीफांवर टीका केली. त्याचा धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी ‘या मातीवर प्रेम करणा-या मुस्लिमांनाही मी बंधू मानतो’, असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.

याच कार्यक्रमात शविसेनेतून पंधरा वर्षांपूर्वी आमदार झालेले व नंतर हसन मुश्रीफांना पाठिंबा देणारे आणि पुन्हा कॉंग्रेसमध्ये गेलेल्या संजय घाटगे व कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आबिटकर यांनी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शविबंधन बांधून शविसेनेत प्रवेश केला. त्यांच्या अनेक समर्थकांचेही उद्धव ठाकरेंनी पक्षात स्वागत केले.

‘स्वाभिमान’ दुखावण्याची कारणे काय?
* सत्यजित पाटलांच्या उमेदवारीला विरोध
उध्दव ठाकरेंच्या गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघामध्ये सभा झाल्या. यातील हातकणंगले मतदारसंघ हा शेट्टींचा आहे. शविसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी लोकसभेला शेट्टी यांचे विरोधक कॉंग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा जाहीरपणे प्रचार केला होता. त्यामुळे ठाकरेंनी त्यांच्याच गावी मेळावा घेतल्याने शेट्टी नाराज झाले आहेत.
* पन्हाळा मतदारसंघावर शेट्टींनी सांगितला दावा
पन्हाळा मतदारसंघातून माजी मंत्री वनिय कोरे यांच्याविरोधात स्वाभिमानीच्या वतीने सदाभाऊ खोत किंवा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व कोरे यांचेच खंदे समर्थक भारत पाटील यांना उमेदवारी देण्याचे शेट्टी यांनी नियोजन केले आहे. त्यासाठी ही जागा स्वाभिमानीला हवी आहे. अशा परिस्थितीत ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात मेळावा घेतल्याने शेट्टी कमालीचे नाराज झाले आहेत.
* येणा-या नेत्यांमुळे आपले जहाज बुडण्याची भीती
स्वाभिमानी संघटनेने विधानसभेसाठी मागितलेल्या जागांचा आकडा मोठा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील त्यांना मोक्याच्या जागा हव्या आहेत. परंतु स्थानिक बलाढ्य नेते मोठ्या संख्येने शविसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ‘दोन्ही कॉंग्रेसचे जहाज बुडणार असल्याने ही पळापळ सुरू आहे. परंतु पक्षप्रवेशाची संख्या वाढल्यामुळे आपलेच जहाज बुडायला नको,’ अशी शेट्टींना भीती वाटते.

मुख्यमंत्र्यांच्या तोंडात पाचर मारले आहे काय?
‘महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न संपला आहे असे बेळगावात येऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या सांगतात आणि त्याबाबत आपले मुख्यमंत्री साधे ताेंडही उघडत नाहीत. त्यांच्या तोंडात पाचर मारले आहे काय?’ अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले. सीमाप्रश्न संपलेला नाही तर तो अजूनही धगधगता आहे. महाराष्ट्र सरकारकडून सोयी सवलती मिळत नाहीत म्हणून इथले उद्योजक कर्नाटकात जात आहेत. परंतु शासनाचा त्याची फिकीर नाही. सीमाबांधवांनो, दोन महनिे कळ सोसा. आमचे सरकार आल्यानंतर कर्नाटकला मराठी हिसका दाखवू, असा इशाराही उद्धव यांनी दिला. सीमाभागातील जनतेवर कानडी सरकारने गेल्या महनि्यात केलेल्या अत्याचाराबाबत महाराष्ट्रातील आघाडी सरकारने बोटचेपी भूमिका घेतल्याबद्दलही उद्धव ठाकरे यांनी यावेळी संताप व्यक्त करत आघाडीची सत्ता घालविण्‍याचे आवाहन केले.

नाराज तर होणारच!
‘आम्हाला विरोध करणा-यांनाच उमेदवारी द्यायची असेल व माझ्या मतदारसंघात मेळावा घेण्यापूर्वी आमच्याशी साधी चर्चाही होणार नसेल तर नाराजी व्यक्त करावीच लागेल,’ अशी तीव्र प्रतिक्रिया देत शेट्टींनी ठाकरेंच्या सभेकडे पाठ फ‍िरवली.

नाराजी दूर होईल
उद्धव ठाकरे यांनी आपल्या दौ-यात राजू शेट्टींविषयी जाहीर भाष्य करणे टाळले. परंतु काेल्हापुरातून जाता जाता पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता ‘माझी आणि शेट्टी यांची भेट झाली की त्यांची नाराजी दूर होईल’, असे त्यांनी सांगितले.