आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्षोभक भाषण प्रकरणी राज ठाकरे यांना जामीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- मुंबईत 2008 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात प्रक्षोभक भाषण केले होते. त्याचे पडसाद सांगली जिल्हय़ातही उमटले होते. कार्यकर्त्यांनी शिराळा येथे जाळपोळ, तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे, शिरीष पारकर यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी 8 जणांचा जामीन न्यायालयाने पूर्वीच मंजूर केला होता. शुक्रवारी जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी राज ठाकरे स्वत: येथील न्यायालयात हजर राहिले. न्यायालयाने त्यांची 15 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली.