आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज ठाकरे हाजिर हो sss... सातारा जिल्हा न्यायालयात घुमला आवाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) सातारा जिल्हा न्यायालयात हजेरी लावली आहे. ठाकरे यांनी 2008 मध्ये येथे केलेल्या प्रक्षोभक भाषणानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहनांची तोडफोड आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर सातारा शहर पोलिस स्टेशनमध्ये तीन आणि सातारा तालुका पोलिस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चार गुन्ह्यांपैकी एकात ठाकरे यांना अटक वॉरंट जारी करण्यात आल्यामुळे आज ते न्यायालयात हजर झाले होते.

राज ठाकरे सकाळी 11 वाजता नऊ कार्यकर्त्यांसह जिल्हा न्यायालयात दाखल झाले. चार वेगवेगळ्या न्यायाधिशांसमोर त्यांनी हजेरी लावून जामीनासाठी अर्ज केला. त्यानुसार न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

ठाकरे येणार असल्याचे कळाल्यानंतर मनसेचे शेकडो कार्यकर्ते न्यायालय आवारात जमा झाले होते. त्यांनी तेथेच घोषणाबाजी सुरु केल्यामुळे काही काळ न्यायालय परिसरात गोँधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य छडीमार करावा लागला.