आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thakare Don\'t Be Make Mistake Devendra Fadanvis

राज ठाकरेंनी भ्रमात राहू नये, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - काँग्रेस-राष्ट्रवादीची भ्रष्ट सत्ता उलथवून लावण्यासाठी समविचारी पक्षांची महायुती झाली आहे. त्यात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे अपेक्षित आहे. त्यासाठी आम्ही राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केली. मात्र, आम्ही महायुतीत घेण्यासाठी मागे लागलो, या भ्रमात त्यांनी राहू नये, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लगावला.


सोमवारी राज ठाकरे यांनी ‘भाजपने यापुढे महायुतीत मनसेला घेण्याबाबत कोणतेही वक्तव्य केल्यास यापूर्वीच्या चर्चेतील तपशील उघड करू’ असा धमकी वजा इशारा दिला होता. त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. महापालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने सांगलीत आले असता पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मोदी सरकारवर टीका करणा-या पक्षांनी स्वत:च्या घरात आधी काय चाललेय, ते पहावे. राष्ट्रवादीचे निम्मे मंत्री गुन्हेगार आहेत. गुजरातमध्ये पोलिसांनी पकडलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण 40 टक्के आहे, तर महाराष्ट्रात 9 टक्के आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वच्छ चारित्र्याचे असल्याची टिमकी काँग्रेस वाजवते; पण त्यांच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालते. मग स्वच्छ चारित्र्याला घेऊन काय करायचे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


सत्ता आल्यास एलबीटी हटवू
एलबीटीच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात व्यापा- यांमध्ये अस्वस्थता आहे. याबाबत फडणवीस म्हणाले, ‘एलबीटीला महायुतीचा विरोधच आहे. व्यापा- यांच्या आंदोलनाला आम्हीही पाठिंबा दिला होता. महायुतीची राज्यात सत्ता आल्यास एलबीटी हटवला जाईल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.