आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनावर 2 कोटींचा खर्च वायफळ : वाघ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनावर दोन कोटी रुपये खर्च करणे म्हणजे पैसे मातीत घातल्याचाच प्रकार असल्याची खरमरीत टीका प्रख्यात कवी विठ्ठल वाघ यांनी केली.
कोल्हापूर येथे आयोजित राजर्षि शाहू ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर चार दिवसांच्या महोत्सवाला सुरुवात झाली. या वेळी वाघ यांनी कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच आईवडिलांचे कष्ट विसरू नका म्हणजे तुमचे पाऊल चुकीचे पडणार नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या वेळी शिक्षण सहसंचालक दिनकर पाटील, कोल्हापूर बोर्डाचे सचिव पायमल, डी. बी. पाटील, डॉ. ज. ल. नागावकर, सचिव एस. जी. राऊत उपस्थित होते.