सांगली - एफआरपीनुसार उसाला एकरकमी २७०० रुपये पहिला हप्ता मिळाला पाहिजे. त्यासाठी सरकारने २५ नोव्हेंबरपर्यंत साखर दर नियामक मंडळ अस्तित्वात आणून निर्णय घ्यावा; अन्यथा या सरकारलादेखील सुट्टी नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी तेराव्या ऊस परिषदेत दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे झाली. या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर पहिल्यांदाच परिषदेला उपस्थित होते. १५ वर्षे काँग्रेस आघाडी सरकारशी संघर्ष केल्यानंतर या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्ताधारी भाजपच्या सोबत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या परिषदेत राजू शेट्टी यांच्या भुमिकेकडे शेतक र्यांचे लक्ष होते.
शेट्टी यांनी
आपल्या भाषणात केंद्र आणि राज्यातील मागील सरकारच्या चुकांचा पाढा वाचून दाखवताना सांगितले, ‘‘शरद पवार यांनी कारखानदारांना वाचवण्यासाठी कायद्यांमध्ये अनेक मेखा मारून ठेवल्या आहेत. राज्य सरकारमध्ये तर कारखानदारच मोठ्या संख्येने असल्याने साखर दर नियामक मंडळ स्थापन करताना दर देणार्या कारखानदारांवर शिक्षेची तरतूदच त्यांनी काढून टाकली. ही तरतूद करून लवकरात लवकर ऊसदर नियामक मंडळ अस्तित्वात आणण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला आहे.’’
शेट्टी म्हणाले, ‘‘आम्ही आता सत्तेत आहोत. आम्ही रस्त्यावरची लढाई करणार नाही; पण शेतकर्यांच्या हितासाठी आम्ही सरकारशीही दोन हात करू. आम्ही उगाचच तुमच्या पालख्या उचलायला सरकारच्या पाठीशी नाही, हे सरकारला ठणकावून सांगितले आहे. शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेणार नसाल तर गेल्या वेळच्या सरकारपेक्षाही तुमची वाईट अवस्था करू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
परिषदेतील ठराव
ठरवलेला दर दिल्यास कारखानदारांना शिक्षा व्हावी
१५ वर्षांतील सामाजिक आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत
ऊसतोडणी मजुरांसाठी महामंडळ स्थापन करावे
तोडणीसाठी केंद्राने १०० रुपये अनुदान द्यावे
केंद्राने दिलेल्या पॅकेजच्या विनियोगाची चौकशी करावी
कृषिमूल्य आयोगाने बेसरेट टक्के करावा
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २० टक्के करावे
मळीच्या आंतरराज्य वाहतुकीवरील बंदी उठवावी
ऊस वाहतूक कपातीची १५ कि.मी.ची अट रद्द करावी
स्वाभिमानीत दुफळीची नांदी
विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती. परिणामी स्वाभिमानीला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही. या बंडखोरांपैकी सांगलीतील संदीप राजोबा वगळता एकही बंडखोर उपस्थित नव्हता. या बंडखोरांनी स्वतंत्र संघटना स्थापन करून ऊसदरासाठी आंदोलन उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.