आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rally Against Temple Corruption In Western Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम महाराष्ट्र देवस्थानातील भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिरासह सुमारे ३०६७ विविध मंदिरांचा कारभार पाहत असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील भ्रष्टाचाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी शहरात भव्य मोर्चा काढला. भ्रष्ट लोकांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष राजाराम माने यांना देण्यात आले.

या देवस्थान समितीच्या अंतर्गत महालक्ष्मी, जोतिबा मंदिरासह कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३०६७ मंदिरे येतात. भाविकांनी दिलेल्या देणग्या, अलंकार याची नोंद नसणे, हजारो एकर जमिनीची परस्पर विल्हेवाट लावणे, खाणकामाच्या रॉयल्टीमध्ये अपहार असे अनेक आरोप या संघटनांनी केले आहेत. याबाबत गेले महिनाभर जनजागरण सुरू होते. सोमवारी सकाळी येथील गांधी मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली व बिंदू चौकामध्ये मोर्चा विसर्जित करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे, शहरप्रमुख महेश उरसाल, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, हिंदू एकताचे चंद्रकांत बराले, जैन संघटनेच्या मीना दोशी, विहिंपचे शहराध्यक्ष अशोक रामचंदानी आदी उपस्थित होते.

‘भ्रष्टांना फाशी द्या’
शासनाने जी मंदिरे ताब्यात घेतली त्यात भ्रष्टाचार झाला. पंढरपूर, शिर्डी, सिद्धिविनायक मंदिरात जमा झालेला देणगीचा पैसा राजकारण्यांच्या घशात गेला. या भ्रष्टाचार्‍यांना भरचौकात फाशी द्या, अशी मागणी सुनील घनवट यांनी केली आहे.