आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आेबीसी असल्यानेच छगन भुजबळ ‘एसीबी’चे टार्गेट : रामदास आठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - महाराष्ट्र सदन व इतर गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याविराेधात कारवाईचा फास आवळला जात असताना सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षाचे नेते व रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले मात्र त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ‘भुजबळ यांच्यावरील कारवाई हे षड््यंत्र आहे. आेबीसी असल्यानेच त्यांना विनाकारण गोवले जात आहे. एकट्या भुजबळांना टार्गेट करणे याेग्य नाही,’ असे मत आठवलेंनी साेमवारी व्यक्त केले.

‘मुंबईत विषारी दारूमुळे शंभरावर जणांचे मृत्यू झाले आहेत. सरकारला बेकायदा दारू विक्री बंद करता येत नसतील तर किमान त्यांना परवाना तरी द्यावा. त्यामुळे महसूल तरी वाढेल,’ असा टाेलाही आठवलेंनी सरकारला लगावला.
बातम्या आणखी आहेत...