आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीडित दलित महिलेला आठवलेंकडून मदत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराड - सातारा जिल्ह्यातील मूळगाव येथील अत्याचारग्रस्त दलित महिलेची रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी भेट घेऊन चौकशी केली. तसेच तिला 30 हजारांची मदतही केली. सदर महिलेच्या मुलाने एका सवर्ण मुलीला पळवून नेल्याप्रकरणी तिला बेदम मारहाण करून धिंड काढली होती. सदर महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणातील दोषींवर तसेच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाºया पोलिसांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आपण गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेणार आहोत. तसेच दलितांवरील वाढत्या अन्यायासंदर्भात पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी, अशी मागणीही करणार असल्याचे आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.