आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरज तालुक्यात बालवाडीतील चिमुरडीवर बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- चॉकलेटचे आमिष दाखवून बालवाडीतील मुलीवर बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी बेडग (ता. मिरज) येथे घडली. पोलिसांनी प्रल्हाद विठ्ठल नाईक या नराधमाला अटक केली आहे. प्रल्हादचे वडील शेतमजुरी करतात. त्याच्या घराच्या मागे पीडीत बालिका राहते. तिचे वडीलही मजुरी करतात. शुक्रवारी दुपारी घरी कोणी नसल्याची संधी साधून प्रल्हादने या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरात बोलाविले व शारीरिक अत्याचार केले. हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी व शेजार्‍यांनी प्रल्हादला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.