आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rapist Get Hanging Punshiment In The Case Of Rape On Child

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्कार करून अल्पवयीन मुलीचा खून करणा-या नराधमाला फाशीची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणा-या नराधमाला इस्लामपूर न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली. जिल्ह्यात सहा महिन्यांत फाशीची शिक्षा सुनावण्याची ही दुसरी घटना आहे.

मूळचा विजापूर जिल्ह्यातील असलेल्या सदाशिव जताप्पा कांबळे (28) याने त्याच्या शेजारी राहणा-या व्यक्तीकडे दोन हजार रुपये हातउसने मागितले होते. मात्र त्यांनी पैसे दिले नाहीत. या रागातून चिडून सदाशिवने त्यांच्या सात वर्षे वयाच्या मुलीचे 27 फेब्रुवारी 2011 रोजी सांगलीतील एका शाळेतून अपहरण केले. मुलीच्या नातेवाइकांनी शोधाशोध करूनही तिचा शोध लागला नाही. अखेर त्यांनी शाळेत चौकशी केली असता मुलीचा मामा असल्याचे सांगून कोणीतरी तिला घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. शिक्षकांनी सांगितलेल्या वर्णनावरून तो सदाशिवच असावा, असा नातेवाइकांना संशय आला.
पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सदाशिवला संशयावरून ताब्यात घेतले. मात्र त्याने दोन दिवस उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या बसताच अखेर त्याने संबंधित मुलीवर काळमवाडी (ता. वाळवा) येथील एका शेतात बलात्कार करून खून केल्याचे कबूल केले.

सहा महिन्यांतील दुसरी शिक्षा
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खुनाच्या प्रकरणात गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात फाशीची शिक्षा झाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मिरज तालुक्यातील बेडग येथे पहिलीत शिकणा-या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणा-या राजू पासवान याला जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. बचावासाठी त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तेथेही फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.