आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट रेशनकार्ड बनवणारी चौघांची टोळी सांगलीत जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- बनावट रेशनकार्ड बनवणार्‍या टोळीचा सांगली पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरातील देवेंद्र हौसिंग सोसायटीतील सुरज हेरवाडे याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्याच्याकडे 229 रेशनकार्डे, अन्न-धान्य वितरण अधिकारी यांच्या नावाचा रबरी शिक्का, तारखेचा शिक्का, स्टॅम्प पॅड, नंबरींग मशिन तसेच केशरी, पिवळे व पांढर्‍या रंगाच्या रेशन कार्डचे कव्हर असे साहित्य आढळून आले. हेरवाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला मदत करणारा अब्बास गैबुसाब मुलतानी हा 2010 मध्ये अन्न धान्य पुरवठा कार्यालयात कंत्राटी काम करत होता. शिवानंद हिरेमठ आणि निजाम शेख यांचाही वरील दोघांना मदत होत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या चौघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडील चौकशी अजून काही आरोपींची नावे समोर येण्याची पोलिसांना आशा आहे.