आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Related Irragation Scam Minister Go Prison : Munde Challenge To Congress Alliance

सिंचन घोटाळ्यातील जबा‍बदार मंत्र्यांना तुरूंगात डांबू : मुंडे यांचा आघाडीला इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - महाराष्ट्रातील सिंचन योजनांची कामे युतीच्या काळातच 80 टक्के पूर्ण झाली. आघाडी सरकारला 20 टक्के कामेही पूर्ण करता आली नाहीत. पुन्हा युतीची सत्ता आल्यास सिंचन घोटाळ्याला जबाबदार भ्रष्ट मंत्र्यांना तुरुंगात डांबू, असा इशारा भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिला.

आमदार सुरेश खाडे यांच्या उपोषणामुळे शासनाने मिरज तालुक्यातील दहा गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी देण्याचे आश्वासन दिले. त्यानिमित्त आयोजित विजयी मेळाव्यात मुंडे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे 71 हजार कोटी रुपये खर्चून राज्यातील सिंचन योजनांतून केवळ दीड टक्का जमीन ओलिताखाली आली. युती सरकारने 80 टक्के केलेली कामेही यांना पूर्ण करता आली नाहीत. यांनी केवळ पैसे खाल्ले. पुन्हा युती सत्तेवर आल्यास पाटबंधारे खाते मी आग्रहाने मागून घेईन आणि या सा-या भ्रष्ट राज्यकर्त्यांना तुरुंगात डांबीन.’’
‘‘राज्याचा विकास झाला, असे आघाडी सरकारचे मंत्री सांगतात. 480 कोटी रुपये दुष्काळासाठी खर्च झाल्याचे मंत्री सांगतात, मात्र हा विकास, हा निधी केवळ माढा लोकसभा मतदारसंघातच खर्च झाला आहे. अन्य दुष्काळग्रस्तांचे काय? सुरेश खाडे हे क्रांतिकारी आमदार आहेत. त्यांनी गेल्यावेळी उपोषण केले आणि सांगली जिल्ह्यात युतीचे तीन आमदार निवडून आले. आता त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी उपोषण केले आहे. यावेळीही युतीला भरघोस यश मिळेल.’’

ऑल इज वेल कुठे?
विरोधी पक्षनेते विनोद तावडे म्हणाले, ‘‘अन्य पक्षांचे नेते दुष्काळ पडू नये म्हणून साकडे घालतात; मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते दुष्काळ पडावा म्हणून साकडे घालतात. पतंगराव कदम यांना कधीही विचारले की ते ‘ऑल इज वेल’ असं सांगतात. कुठे आहे ऑल इज वेल, हा मला प्रश्न पडतो.’’