आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रक-कारची समोरासमोर धडक दिल्लीचे दोन ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - मिरज-पंढरपूर राज्य महामार्गावर कवठे महांकाळ तालुक्यातील लांडगेवाडीजवळ इंडिका कार आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी अकराच्या सुमारास घडला.
दिल्ली येथील माजीलाल जियालाल जैन (72) आणि महेंद्र सुरेशभान जैन (70) हे दोघे गांधीनगर (कोल्हापूर) येथून सोलापूरकडे निघाले होते. त्यासाठी त्यांनी रुकडी येथील मुश्ताक अहमद हरुंद रसिद पाटील यांची इंडिका कार भाड्याने घेतली होती. जैन बंधू हे व्यापारी असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. सकाळी 9 ला ते गांधीनगरहून निघाले. कवठे महांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी ते कुचीदरम्यान असलेल्या शेरी पुलापासून 100 मीटर अंतरावर कारला सोलापूरहून सिमेंटची पोती घेऊन मिरजेकडे निघालेल्या ट्रकने समोरून जोराची धडक दिली.
यात माजीलाल जैन, महेंद्र जैन आणि चालक इलियास मुश्ताक अहमद पाटील (वय 45) हे तिघेही जागीच ठार झाले. या अपघाताची कवठे महांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.