आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंसोबत पोलिसांनी केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांनी यापूढे असे वागणार नाही, असे पोलिसांना सांगितले आहे. - Divya Marathi
मुलांनी यापूढे असे वागणार नाही, असे पोलिसांना सांगितले आहे.
कोल्हापूर- महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. तरुणींची छेड काढणाऱ्या 25 रोडरोमिओंना पोलिसांनी बस स्थानक चौकात 100 उठाबशा काढायला लावल्या.
 
कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. याबाबत अनेक तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्यतल्या भुदरगड पोलिसांनी रोडरोमिओंवर धडक कारवाई केली.
 
भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील मौनी विद्यापीठ आणि बस स्थानकावर मुलींची छेड काढणाऱ्या 25 रोडरोमिओंवर भुदरगड पोलिसांनी कारवाई केली. 25 रोड रोमिओंना भर वस्तीत असणाऱ्या बस स्थानक चौकात 100 उठाबशा काढलायला लावल्या. भुदरगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चौधरी यांनी दिव्य मराठी वेबप्रतिनिधीला ही माहिती दिली.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...