आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मृतदेह सोडून साथीदार पसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- चोरीच्या उद्देशाने बंगल्यात आलेल्या चोरट्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरट्याचे इतर साथीदार त्याचा मृतदेह सोडून पसार झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील कराडमधील चौंडेश्वरीनगरातील गजानन हौसिंग सोसायटीजवळील पायस एंटरप्रायझेस बंगल्यात ही घटना आज (मंगळवार) उघडकीस आली.

 

सूत्रांनुसार, तत्पूर्वी चोरट्यांनी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. मृत चोरट्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, त्याच्यासोबत आणखी काहीजण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 

मंदार जयराम जोशी हे या इंटरप्रायझेसचे मालक आहे. पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी घटनास्थळाची पाहाणी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिस करत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...