आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दरोडेखोरांचा पतीसमक्ष महिलेवर बलात्कार, सातारा जिल्ह्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - शाळेच्या सुरक्षारक्षकास जबर मारहाण करत त्याच्या पत्नीवर दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना सातारा-कोरेगाव रस्त्यावरील त्रिपुटीजवळ शुक्रवारी पहाटे घडली. येथून जवळच असलेल्या एका हॉटेलवरही दरोडा टाकला. या दोन्ही घटनात सुमारे २० हजारांचा ऐवज लुटण्यात आला.

शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सात ते दहा दरोडेखोरांनी एका शाळेच्या परिसरात येऊन रखवालदाराच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, संशय आल्याने व भीतीपोटी रखवालदाराने काही दार उघडले नाही. त्यामुळे दरोडेखोरांनी घराच्या खिडकीच्या काचा फोडून कडी काढली व रखवालदारासह त्याच्या पत्नीस बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर या रखवालदारासमक्ष त्याच्या पत्नीवर तीन दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला. तसेच त्यांच्या घरातील तीन हजार रुपयेही घेऊन पळ काढला. या शाळेशेजारी असलेल्या एका हॉटेलमध्येही घुसून लूट करण्याचा दरोडेखोरांनी प्रयत्न केला. हॉटेलात झोपलेल्या वेटर्सना उठवून, त्यांना चाकूचा धाक दाखवून आरोपींनी सीडीप्लेअर, गॅस सिलिंडर, दोन हजार रुपये पळवले.
हॉटेलचे मालक वसंतराव वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चारच्या सुमारास एका वाहनातून आठ - दहा दरोडेखोर आले होते. त्यांच्याकडे काठ्या, परशू, चाकूसारखी हत्यारे होती. ते मराठी, हिंदी, कानडीत बोलत होते. पैसे घेऊन त्यांनी कोरेगावच्या दिशेने पलायन केले. दरम्यान, वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे, तर पीडित महिलेला सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा मुंबईत तरुणीवर तिघांचा सामूहिक बलात्कार