आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूढ उकलले : वारणाच्या कार्यालयातून मैनुद्दीनने चोरले ३ कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - मिरजेतील मासे विक्रेता मैनुद्दीन मुल्ला याने वारणा शिक्षण संस्थेच्या कार्यालयातून तीन कोटी रुपये चोरल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मैनुद्दीनने ही कबुली दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील बिल्डर झुंजार सरनोबत यांची ही रक्कम असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, पोलिसांनी सांगेपर्यंत सरनोबत यांना या रकमेची चोरी झाल्याचे माहिती नव्हते हे विशेष.

मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जाखले गावचा असलेला मैनुद्दीन याच्या मिरजेतील घरातून १२ मार्चला ३ कोटी ७ लाख ६३ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले होते. तसेच त्याच्याकडील दोन नव्या बुलेटही जप्त करण्यात आल्या होत्या. मैनुद्दीनकडे एवढी रक्कम कोठून आली, हा पोलिसांपुढे प्रश्न होता.

तपासादरम्यान त्याने ही रक्कम आपण चोरल्याचे सांगितले होते. मात्र, ती कोठून चोरली, याची माहिती दिली नव्हती. पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी मैनुद्दीनकडून ही माहिती काढून घेतली. मैनुद्दीन हा वाहन चालक म्हणून काम करायचा. त्याचे मूळ गाव जाखले हे वारणानगरपासून जवळच आहे. त्यामुळे वारणा उद्योग समूहाशी संबंधित संस्थांच्या वाहनांचा चालक म्हणूनही त्याने काम केले आहे. वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या इमारतीच्या स्टोअर रूममध्ये काही रक्कम असल्याची टीप त्याला मिळाली होती. त्यानुसार मैनुद्दीनने परप्रांतीय साथीदाराच्या मदतीने आठ मार्चला स्टोअर रूमचे कुलूप तोडून भरदिवसा पैशांची बॅग पळवली होती. साथीदाराला काही रक्कम दिली आणि उर्वरित रक्कम घेऊन तो मिरजेतील बेथेलहेमनगरातील सासुरवाडीत आला. ही रक्कम कोणाची आणि किती आहे, तपासादरम्यान त्याने ही रक्कम वारणानगर येथून चोरल्याचे सांगितल्यानंतर तिथे जाऊन तपासणी केली असता पोलिसांना तिथे आणखी रक्कम आढळली. ही खोली आशुतोष पाटील यांची आहे. पाटील यांचे साडू कोल्हापुरातील बिल्डर झुंजार सरनोबत यांनी परगावी जाण्यापूर्वी ही रक्कम ठेवायला दिली होती. आशुतोष यांनी ती वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या इमारतीतील स्टोअर रूममध्ये
ठेवली होती. ती मैनुद्दीनने चोरली.
पोलिसांच्या छाप्यात सव्वा कोटी आणखी सापडले
कोल्हापूर - वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या कॅम्पसमधून तीन कोटी रुपये चोरीस गेल्याचे उघडकीला अाल्याने पाेलिसांनी या कॅम्पसमध्ये येऊन बुधवारी चाैकशी केली. त्या वेळी या कॅम्पसमध्ये अाणखी १ काेटी ३१ लाख रुपयांची राेकड पाेलिसांना अाढळून अाली. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अाणखीच वाढत चालले अाहे. बिल्डर झुंजार सरनोबत यांनी हे पैसे वारणानगरलाच का अाणून ठेवले, याचाही पाेलिस शाेध घेत अाहेत. सरनोबत हे कोल्हापुरातील अनेक वर्षे व्यवसाय करणारे बिल्डर आहेत. मात्र, कोल्हापूरचे असताना त्यांनी एवढी मोठी रक्कम वारणानगर येथील शिक्षण संस्थेच्या कॅम्पसमधील फ्लॅटमध्ये का नेऊन ठेवली, चोरी झाल्यानंतर आठवड्याभराने फिर्याद का दिली? अादी प्रश्नांची उत्तरे अाता पाेलिस शाेधत अाहेत.