आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदाभाऊ म्हणाले, शेतकरी संघटनेतुन मला हाकलून काढले, पहिला मेळावा इचलकरंजीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर-  मी पळणारा कार्यकर्ता नाही, त्यामुळे पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही, मला हाकलून काढले आहे, पळवून लावले आहे, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
 
ते म्हणाले, पळवून नेणारे अनेक जण आहेत, पण पळून जाणाऱ्यांचा हा दोष आहे, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली होती, त्याला मंत्री सदाभाऊ खोत यांनी या भाषेत उत्तर दिले. सदाभाऊ खोत यांनी आज माजी आमदार महादेराव महाडीक यांची कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्यावर भेट घेतली. यावेळी राजारामचे अध्यक्ष सर्जेराव माने, संचालक दिलीप पाटील, संभाजी महाडीक, माजी कार्यकारी संचालक पी.जी. मेढे आदि उपस्थित होते. 
सदाभाऊ खोत म्हणाले, मी पळून गेलोच नाही. ज्यांची पात्रता नाही त्यांच्यासमोर मला चौकशीला बोलवले. मीही ताठ मानेने या चौकशीला पुढे गेलो. नंतर माझी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे पळून जाण्याचा विषयच नाही.
 
हातकणंगलेत लोकसभेसाठी मशागत सुरू?
हातकणंगलेत लोकसभेसाठी मशागत सुरू आहे का? या प्रश्नावर मंत्री खोत म्हणाले, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याला रानात घात कधी आहे, पेरणी कधी करावी हे सांगायला लागत नाही आणि हे सांगणारी शाळाही कुठे नाही. त्यामुळे योग्यवेळी कुरी खांद्यावर घेऊन पेरणीसाठी सज्ज असेन.
 
इचलकरंजीत संघटनेचा पहिला शेतकरी मेळावा
नव्या संघटनेबद्दल आणखी  विचारले असता ते म्हणाले, नव्या संघटनेची घोषणा केल्यानंतर मी अनेकांशी संपर्क साधला. काहींना प्रत्यक्ष जाऊन भेटलो. अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. इचलकरंजीत संघटनेचा पहिला शेतकरी मेळावा होणार असून त्यामध्ये नव्या संघटनेचे धोरण जाहीर होईल.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...