आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदाभाऊ म्हणाले, सुकाणू नव्हे ती तर सुकलेली समिती, त्यांच्यासोबत चर्चा करण्यात अर्थ नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 कोल्हापूर- राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आज कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेखाली कर्जमाफी प्रमाणपत्र कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
 
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमागणीच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत कर्जमाफीच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी राज्यभरातील काही शेतकरी व शेतकरी संघटनांच्या नेत्यांची एक सुकाणू समिती नेमण्यात आली होती. राज्य सरकारने आज 1 लाख 50 हजाराची कर्जमाफी केल्याची प्रमाणपत्रे संपुर्ण राज्यात शेतकऱ्यांना वितरित केली. मात्र या सुकाणू समितीला ही कर्ज माफी मान्य नसल्याबद्दल राज्याचे कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना विचारल्यावर ते म्हणाले, सुकाणू समिती म्हणजे समांतर सरकार नव्हे, देश हा लोकशाही च्या माध्यमातून चालत असतो. आम्ही 1.50 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुकाणू समिती म्हणजे सुकलेली समिती आहे. त्याच्यावर फार काही चर्चा करण्याचे कारण नाही.

या सुकाणू समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आहेत म्हणूनच सदाभाऊ असे म्हणाले का अशी चर्चा मात्र कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू होती.
 
 
बातम्या आणखी आहेत...