आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडलिकांना शिवसेनेतूनच विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - कॉँग्रेसने उमेदवारी नाकारल्यास महायुतीचा झेंडा खांद्यावर घेण्यासाठी खासदार सदाशिवराव मंडलिक तयार असले तरी शिवसेनेतूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. मंडलिक हे टीआरपी वाढवण्यासाठी बेछूट वक्तव्ये करत असल्याचा आरोप शिवसेनेचे इच्छुक उमेदवार विजय देवणे यांनी केला आहे.

मंडलिक यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष निवडून येऊन कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतले होते. त्यामुळे कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसकडे घेता येईल व त्या जागी चिरंजीव व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांची वर्णी लावण्याचे मंडलिक यांचे नियोजन होते. परंतु शरद पवार यांनी कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडेच घेतली असून तेथून धनंजय महाडिक यांचे नाव निश्चित केले आहे. यामुळे संतापलेल्या मंडलिक यांनी महायुतीचा झेंडा खांद्यावर घेण्याचे संकेत दिले आहेत. गेल्यावेळी मंडलिक यांनी शिवसेनेचे विजय देवणे व राष्ट्रवादीचे संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला होता. परंतु यंदा मंडलिक यांना उमेदवारी देण्याबाबत शिवसैनिकांमध्येही एकमत नाही.

खुद्द देवणे यांनी मंडलिकांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला असून देवणेना डावलल्यास मंडलिक यांच्या तालुक्यातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे.