आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्‍हापुरातून टोल हद्दपार होईपर्यंत लढणार- सदाशिवराव मंडलिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्‍हापूर- कोल्‍हापूर शहर रस्‍ते विकास प्रकल्‍पांतर्गत कोल्‍हापूर शहरामध्‍ये 2008 साली आयआरबी, कोल्‍हापूर महानगरपालिका व महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळ यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या करारावेळी लोकप्रतिनिधींला विश्‍वासात न घेता तो लादण्‍यात आल्‍याची तक्रार मुख्‍यमंत्र्याकडे करण्‍यात आल्‍याचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी म्‍हटले आहे. जोपर्यंत कोल्‍हापूर जिल्‍ह्यातून टोल हद्दपार होत नाही. तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

शहरांतर्गत टोल वसूल करणारा कोल्‍हापूर हा संपूर्ण भारतातील एकमेव शहर आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम अन्‍वये शहरातील रस्‍ते बांधणे व ते सुस्थितीत ठेवण्‍याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. महापालिका नागरिकांकडून नियमित कर घेत असतानाही टोलचा भुर्दंड नागरिकांवर का लादला जातो ? असा सवालही त्‍यांनी यावेळी उपस्थित केला.