आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरातील शिवाजी पूलाचा प्रश्न: खा. संभाजीराजेंनी घेतली पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांची भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार संभाजीराजे छत्रपती. - Divya Marathi
खासदार संभाजीराजे छत्रपती.
कोल्हापूर- कोल्हापूरवासियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शिवाजी पुलाचे काम करण्यात ज्या अडचणी आहेत. त्यातून तात्काळ मार्ग काढावा प्रसंगी सरकारने कायदा पारित होत नसेल तर वटहुकूम काढावा व येथील जनतेच्या जनभावना लक्षात घ्याव्यात असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या बरोबर पंतप्रधान कार्यालयात झालेल्या भेटीत व्यक्त केले. 
 
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिवाजी पूल प्रश्नी ज्या जागेबाबत आक्षेप घेतला जातोय त्या जागेवर सध्या कुठल्याही स्वरूपाचे प्रत्यक्ष स्मारक नाही त्यामुळे जे अडकलेले काम आहे ते पूर्ण करण्यास हरकत नाही ही बाब संभाजीराजे यांनी नृपेंद्र मिश्रा यांच्या लक्षात आणून दिली. या विषयावर मिश्रा यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देऊन  कोल्हापूरातील शिवाजी पूलप्रश्नी ज्या अडचणी आहेत त्यावर लवकरच मार्ग काढला जाईल व हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे सांगितले. नृपेंद्र मिश्रा यांनी संबंधित पुरातत्व खात्याकडून या विषयासंबधीचा अहवाल मागविला आहे. 

छत्रपती संभाजीराजे यांनी शिवाजी पुलाचे उर्वरित काम तातडीने सुरु करावे अशी मागणी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत व राज्यसभेत केली होती.  प्राचीन वास्तू व पुरातत्वीय कायद्यातील (अॅमसर अॅक्ट, 2010) ऐतिहासिक वास्तूंपासून शंभर मीटर अंतरापर्यंत बांधकाम करता येत नाही, या तरतुदीकडे बोट दाखवून या पुलाच्या कामावर निर्बंध घालण्यात आले होते. परिणामी नव्या पूलाचे काम ठप्प पडलेले आहे. त्यामुळे 1877 मध्ये ब्रिटिशांनी बांधलेल्या जुन्या व धोकादायक बनलेल्या पुलावरूनच रहदारी सुरू असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपतींनी पंतप्रधानांना दिली होती. त्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयाची तात्काळ दखल घेत केंद्र सरकारने प्राचीन वारसा वास्तू संरक्षण कायद्यात दुरुस्ती (अॅमसर अॅक्ट)  विधेयक संसदेत आणले  होते. परंतु हे विधेयक  संसदेतील GST व नोटाबंदी गदारोळामुळे पावसाळी अधिवेशनात पारित होवू शकले नाही, म्हणून आणखी वाट न पाहता कायदा दुरुस्तीचा वटहुकूम काढावा अशी जोरदार आग्रही मागणी त्यावेळी खासदार  संभाजीराजे छत्रपती यांनी  राज्यसभेत विशेष उल्लेखाद्वारे केली होती. 

येत्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा प्रश्न सभागृहात लावून धरणार आहे व या संबधीचा कायदा पारित होत नसेल तर सरकारने अध्यादेश काढावा यासाठी आपण आग्रही राहू. कोल्हापूरवासियांसाठी अत्यंत महत्वचा विषय असलेल्या शिवाजी पुलाचे काम त्वरित सुरु करण्याची जी मागणी आहे ती पूर्ण करून घेण्यासाठी कटिबद्ध आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...