आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 टन रक्तचंदन, 100 लिटर चंदनाचे तेल चोरीस, 72 लाखाचा मुद्देमाल वनविभागाच्या ताब्यातून गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वनविभागाच्या नर्सरीमधून 5 टनरक्तचंदनाच्या लाकडाची चोरी झाली आहे. - Divya Marathi
वनविभागाच्या नर्सरीमधून 5 टनरक्तचंदनाच्या लाकडाची चोरी झाली आहे.
कोल्हापूर- वनविभागाच्या नर्सरीमधून 5 टन रक्तचंदनाचे लाकूड आणि 60 लाख रुपये किमतीचे चंदनाचे 100 लिटर तेल चोरीस गेले आहे. चिखली येथे ही चोरी झाली. रक्तचंदनाच्या 5 टनाची किंमत 12 लाख रुपये तर चंदनाचे 100 लिटर तेलाच्या डब्यांची किंमत 60 लाख रुपये आहे.  याबाबत करवीर पोलिसात गुन्हा दाखला करण्यात आला आहे.
 
 
 याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वनखात्याने 2012 साली विविध प्रकरणात  सुमारे 5 टन रक्त चंदनाचे लाकूड आणि 100 लिटर चंदनाचे तेल जप्‍त केले होते. या जप्त मुद्देमालाबाबत न्यायालयात सुनावणी सुरु होती. त्यामुळे जप्त मुद्देमाल कोल्हापूर वनखात्याच्या ताब्यातच चिखली येथील रोपवाटिकेत (स्काऊट बंगल्याशेजारी) ठेवण्यात आला होता. याठिकाणी केवळ 2 वन मजुरांना सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. आज मध्यरात्री 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान येथील वनविभागाच्या वनमजूरांना मारहाण करून 10 ते 12 अज्ञातांनी सर्व मुद्देमाल चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. 
 
मुद्देमाल केवळ 2 वन मजुरांच्या सुरक्षेत
72 लाख रुपयांचा चंदनाचा मुद्देमाल केवळ 2 वन मजुरांच्या सुरक्षेत ठेवण्यात आल्याने आणि वनमजुरांना मारहाण करून तो चोरून नेल्याने या घटनेबाबत संशय निर्माण झाला आहे. 
मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, वनाधिकारी विजय जाधव व कर्मचारी आज सकाळपासून घटनास्थळी उपस्‍थित होते. या ठिकाणी पोलिसांचे श्वान पथक आले होते. मात्र पावसामुळे श्वान पथक घटनास्थळावरच घुटमळले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...