आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sandhyadevi Kupekar News In Marathi, NCP, Maharashtra Assembly Election 2014

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकरांची निवडणुकीतून अचानक माघार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - विधानसभेचे दिवंगत सभापती बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी व चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी अचानक ‘आपण या निवडणुकीला उभे राहणार नाही,’ अशी घोषणा मंगळवारी उमेदवारीसाठी कुपेकरांच्या घरातच तिघे तिघे इच्छुक असे चित्र निर्माण झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

कुपेकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांनी या जागेवर दावा केला होता; परंतु त्या वेळी त्यांची समजूत काढून संध्यादेवी यांना उमेदवारी देण्यात आली. त्या वेळी संध्यादेवी ३० हजार मतांनी विजयी झाल्या. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांच्यासमोर आव्हान उभे केले होते.

या पार्श्वभूमीवर यंदा मात्र कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणार असल्याचे संग्राम यांनी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच स्पष्ट केले. कुपेकर यांच्या दोन्ही दिरांनी संग्राम यांना पाठिंबा दिला. अशातच बाबासाहेबांच्या नागपूरस्थित कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांचेही नाव चर्चेत येऊ लागल्याने संग्राम यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कानडेवाडी येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत संध्यादेवी यांनी आपण उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले. आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.