आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पवार निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - सांगलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय पवार यांना कामातील अनियमितता आणि सार्वजनिक ठिकाणी पदास अशोभनीय वर्तन केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे.पवार यांच्याबाबत गेल्या दोन वर्षांपासून गंभीर स्वरूपाच्या तक्रारी होत्या. त्यांनी कार्यालयातच लोकांसमोर कमरेला अडकवलेले पिस्तूल टेबलवर काढून ठेवल्याची तक्रार होती, तर मिरजेतील महसूल भवनमध्ये रात्री ओली पार्टी केल्याची तक्रार तत्कालीन पालकमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे करण्यात आली होती. कनिष्ठ अधिका-यांशी गैरवर्तन करत असल्याच्याही अनेक तक्रारी होत्या. या सर्व तक्रारींची उशिरा का हाेईना प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात अाली.

तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी पवार यांच्या गैरवर्तनाबाबतचा अहवाल राज्य शासनाला पाठवला होता. सरकार दरबारीही त्यांची गांभीर्याने दखल घेण्यात अाली. त्यानुसार पवारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समजते. तसे पत्र गुरुवारी पवार यांना मिळाले आहे.