आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली जिल्ह्यातही एका गावाचा बहिष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात आज शांततेत सरासरी 62 टक्के मतदान झाले. कडेगाव तालुक्यातील ढाणेवाडी गावाने मतदानावर बहिष्कार टाकला; मात्र सायंकाळी एका दांपत्याने मतदान केले. या वेळी मतदारसंघात 2 लाख नवे मतदार नोंदवले गेल्याने तरुणांचा सकाळपासूनच मतदानासाठी उत्साह होता. विशेषत: ग्रामीण भागात मतदानाला चांगला प्रतिसाद होता. तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात 70 टक्के, तर मिरज मतदारसंघात पाच वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले .

सदाभाऊ खोत यांनी मतदान केलेच नाही : माढा लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाभाऊ खोत यांचे नाव सांगली जिल्ह्यातील मरळनाथपूर या त्यांच्या गावी मतदार यादीत आहे. त्यांच्या गावापासून माढा मतदारसंघाचे किमान अंतर 3 तास आहे. त्यामुळे गावी येऊन सदाभाऊ खोत यांना मतदान करता आले नाही. पुणे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम, वनमंत्री पतंगराव कदम यांनी मात्र पुण्यातून कडेगाव येथे येऊन मतदान केले.