आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीचा जवान लडाखमध्ये शहीद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - सांगली जिल्ह्यातील नीलेश काकासाहेब निकम (वय 24) हा जवान लडाखपासून काही अंतरावर कर्तव्य बजावत असताना शहीद झाला. नेमके कोणत्या कारणाने त्यांना वीरगती प्राप्त झाली याचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. शनिवारी सायंकाळपर्यंत नीलेश यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी शेगाव येथे आणण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. चार वर्षांपूर्वी नीलेश निकम लष्करात भरती झाले. त्यांचे अद्याप लग्न झालेले नाही. काकासाहेब निकम यांना नीलेश हा एकुलता एक मुलगा. त्याच्या जाण्याने निकम कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. लडाखपासून काही अंतरावरील त्सांगसे या ठिकाणी निकम हे कर्तव्य बजावत होते. तेथेच त्यांना वीरगती प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

(फोटो - नीलेश काकासाहेब निकम)