आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या थर्ड डिग्रीने अनिकेतचा मृत्यू; सांगलीत बंदला गालबोट, दोन एसटी बस फोडल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी सांगलीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. औरंगाबाद-सांगली आणि सांगली- सातारा एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. ही घटना बस स्थानकावर घडली. संतप्त जमावाने रस्त्यावर टायर जाळले. पोलिस या घटनांवर लक्ष ठेऊन आहेत. 
 
अनिकेत कोथळेच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणाची केस ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडे दिली जाणार आहे. शिवाय या प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. कोथळे कुटुंबीयांना दहा लाख रुपये अर्थसहाय्य केले जाणार आहे. शिवाय साक्षीदार आणि कोथळे कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले असल्याचेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

पोलिस कोठडीत देण्यात आलेल्या थर्ड डिग्रीमुळे अनिकेत कोथळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी सांगलीत आज (सोमवारी) सर्व पक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला गालबोट लागले आहे.

दरम्यान, सांगलीतल्या अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आत्तापर्यंत एकूण 12 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये पोलिस उपनिरीक्षकासह, ठाणे अंमलदार आणि त्याच्या मदतनीसाचाही समावेश आहे. अनिकेतच्या मृत्यूपाठीमागे सेक्स रॅकेट असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या हत्येसाठी पोलिसांनीच सुपारी घेतली असल्याचा आरोप अनिकेतच्या भावाने केला आहे. अतिशय नाट्यपूर्ण या घटनेत पोलिसांच्या एका पथकाने अनिकेत कोथळेच्या मृतदेहाची आंबोली घाटात विल्हेवाट लावली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... युवराज कामटे याला फाशीची शिक्षा दिली नाही, तर आम्ही सर्व कुटुंबीय स्वत:ला जाळून घेऊ- अनिकेतचे कुटुंबिय...
बातम्या आणखी आहेत...